गैरसमज...
पाण्यासारखे जीवनाला , नित्यं वाहू दे , साचवु नको गं सखे, ठैराव मनातच राहू दे ... पाझर तो मायेचा डोंगराला , तूला ना कळला, आता कोरड्या बाष्पाचा , उकाळा रा हू दे ... घननिळ दाटला डोळ्यांत , तुला मृगजळ भासे , माझा दोष नाही आता , संवादातला रस राहू दे... समजून घ्यायचेच नव्हते तुला , तोडली तु नाळ, गैरसमजाने गैर केले, आता आपलेपण राहू दे ... गुन्हा माझा नाही , दोष तुझाही नाही सखे , विश्वास कमी फक्त, आता नवे बहाणे राहू दे ... पाण्यासारखे जीवनाला , नित्यं वाहू दे , साचवु नको गं सखे, ठैराव मनातच राहू दे ...