पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हाक देते मी...

  सांडग आपली श्रावणातली , तु ऊन मी रिमझीमणारी सर, कधी भेटतो गर्जून , कधी इंद्रधनुष्यी रंगलेली धून... मी वाहणारा बेधुंद वारा, तु स्तब्ध तठस्थ वड , झिरपते मग मी पानापनातून , तुझ ओलचिंब झालेल मन ... सागरी मुऊशार किनारा तु , उमटलेले पाऊलांची ठसे मी, लाटेसवे दोघेही विरघळून  , रंग उमटती क्षितीजातून ... तुझे माझे काही जमेना तरी, तुझ्यासाठीच हूर हूर उरी , प्रेम माझे दिसते तुझ्या डोळ्यातून, हाक देते मी काळजातून ... सांडग आपली श्रावणातली , तु ऊन मी रिमझीमणारी सर, कधी भेटतो गर्जून , कधी इंद्रधनुष्यी रंगलेली धून...

माझा झोका...

  अकाशात गेला ,उंच माझा झोका , पलटूनी आला , उंच माझा झोका ... मनात गुदगुल्या , हर्ष वेगळाच झाला, आहे स्वर्ग सुखाचा, उंच माझा झोका ... पंखावरी ओढले मी , निळाईचे रंग , क्षितीजापरी लाल , उंच माझा झोका... तुला मनात भरले , पोकळी ना उरली, भरल्या मनाने झूलला, उंच माझा झोका... थांबना जरासा ,माझे ना काही येथे , मन तरी घुटमळे घेत, उंच माझा झोका... ओंजळीत भरल्या ,सरी पावसाळी , निसटल्या येथेच मी घेता ,उंच माझा झोका ... काशात गेला ,उंच माझा झोका , पलटूनी आला , उंच माझा झोका ...

मकरंद प्रेमाचा बोलला...

  छंद तुझा लागला , मकरंद प्रेमाचा बोलला ... भास तुझा चोहीकडे , आरसाही मग हळूच छेड काढे, का? तु असा माझ्यात गुंतला , छंद तुझा लागला ... प्रतिबिंब तुझे माझ्यात गडे , किती लाजू तुझ्या नावाने ऐके ना सवंगडे, का? माझा श्वास तुझ्यात गुंतला , छंद तुझा लागला... दिसे ना मज बंधनांची कडे , स्वर्गसुख हेच सांगत मन उंच उडे, का ? मनाने ध्यास तुझाच घेतला , छंद तुझा लागला ... प्रेमाच्या रस्त्यावरही ना रुततील खडे, तुझा हात असे हाती मिळून आयुष्याचे गिरवू धडे , का ? मजवर रंग तुझाच चढला , छंद तुझा लागला ... छंद तुझा लागला , मकरंद प्रेमाचा बोलला ...

लग्नाची बेडी ...

  एकमेकांना एकमेकांसाठी निवडले , पडता अक्षता डोईवर दोन जीव एक झाले ... विचार वेगळे आचार वेगळे वेगळे सारं काही , भिन्न विचारात जन्मजन्माचे सोबती कसे झाले ... नवीन सारं काही म्हणून जुळवाजुळव करून पाहे  , कुठे जुळेना स्वभाव लहान गोष्टीचाही गदारोळ चाले ... शेवटी दोघांनाही कळून चुकले संसाराचे गणित , एकमेकांसाठी नाही बनले दोघं लग्नाच्या बेडीत अडकले... सोडून पाहे गाठ आयुष्याची ती ही सुटे नाही , पडल्या गाठी तरी लाजेसाठी बघा संसाराचा गाडा चाले ...

भावनांना पुर आला...

  गारवा तुषारांचा गालावर ओघळला, थंडगार झुळकेसह तेव्हा भावनांना पुर आला... हव्याहव्याश्या या रिमझीम धारा, हर्ष मनाचा ओसंडला भावनांना पूर आला... निळ्या आकाशाला वेढले काळ्या ढगांनी, प्रेम होऊन बरसली सर तेव्हा भावनांना पूर आला... हूरहूर ती कातरवेळी तुझ्याच आठवांची कातर, ओलांडला उबंरठा पावसात तेव्हा भावनांना पूर आला... प्रेमाच्या वाटेवर सांभाळता सांभाळत नाही मन, खळाळत जाते समुद्राकडे तेव्हा भावनांना पूर आला...

प्रेमत्रिकोण...

 हळुच डोकावले होते मी हृदयात त्याच्या , आज हसतांना दिसला ,ती जागा कधी माझी होती ... मग डोळयांनीच विचारले माझ्या त्याला, जो डाव मनासोबत खेळला माझ्या  ,चूक माझी होती... ओठ शिवले माझे रेशमी धाग्यांना तोडून, सोडून गेलास मला तु , तिच का ? तुझ प्रेम होती ... मला कळलंच नाही बघ ना हा प्रेम त्रिकोण, मी मनात तुला ठेवले आणि तुझ्या मनात ती होती... आज असह्य होत आहेत या भावना तरी, भावविभोर मन शांत होईल बघून, तुझा आनंद ती होती ... कळली आता कुठे या मनाची चाहूल मला, प्रेमात सर्वस्व अर्पण  करून जगणारी राधा होती ...

अपहरण...

  ओढ होती त्या पाखराला आकाशात झुलायची , चंद्र सूर्य ताऱ्यांनाही ओजंळीतून न्याहाळायाची ... उंच उंच झेप घेत पंखावर आसमंत घ्यायची , ढगांचा पाझर आपल्या चोचीतून चाखायची ... पसरता पंख काटा काटेरी कुंपणाचा रुतला , किंचाळला पाहूनी रक्तबंबाळ काया पंखाची ... जखमी वाटेवर आता अपहरण भावनांचे झाले, रुते काटे कैक चालतांना का? वाट रुसली त्याची ...

बंध प्रेमाच्या सहवासाचे...

  कधी विसरू लागले मी, बंध प्रेमाच्या सहवासाचे , हृदयाला हाक देऊन सांग,बंध प्रेमाच्या सहवासाचे ... प्रेमात बुडालेले जग माझे, कधी कोरडे जाहले , ओलावा दे त्या आठवांचा ,बंध प्रेमाच्या सहवासाचे , रित्या रित्या मनात , दाटला जाळ विरहांचा , फुंकर घाल वेदनेला ,बंध प्रेमाच्या सहवासाचे ... भेटलो होतो कधी, वळण जपून ठेव मनात, रस्ता चुकला तर उकल, बंध प्रेमाच्या सहवासाचे ... शब्द आले दाटून, प्रेमाने जेव्हा हूंदका दिला, का? आठवावे लागे तुला,बंध प्रेमाच्या सहवासाचे ...

तु दवबिंदु सखे...

  हिरव्या तृणावरचा तू तो दवबिंदू सखे , मोत्यासारखा चमकते तो दवबिंदू सखे सहस्त्र विजा हृदयावर तुला पाहता , चंद्र लपतो कमळपर्णी तो दवबिंदू सखे ... सौंदर्याचा अर्थ वाहणारा झरा तू , ओंजळीत तृप्त करते तो दवबिंदू सखे ... दोन डोळ्यांची कैफियत काय ? सांगू तुला , हुरहुरणारे काळीज तहान तो दवबिंदू सखे ... खरं सांगतो गझल लिहिता येत नाही मला , लिहिण्यास भाग पाडते तो दवबिंदू सखे ... लपतो कधी पाण्यात कधी त्या पावसात , अदृश्य तरी सुड माझाच तो दवबिंदू सखे ... हिरव्या तृणावरचा तू तो दवबिंदू सखे , मोत्यासारखा चमकते तो दवबिंदू सखे

मेघ बरसले...

  मेघ दाटूनी आले रंग काळ्या करड्या ढंगांनी , किलबील पक्षांची वाहे गंधाळलेली रातरानी ... कळ येई धरणी हासला मृदूगंध वाऱ्यामधूनी , मन चंचल धावे प्रिती मागे आना त्याला पकडूनी ... अश्या पहरी प्रेमाच्या जीव गेला गुंतूनी , शब्द ओठी आले डोळे बोलता लाजूनी ... वेड प्रेमाचे गुलाबाला गुलाबी झाला चंद्र मनी , मेघ बरसले छंद हा आभाळाचा पांघरूनी ... वेडावल्या भावना वेडावली प्रित गाणी ... साद देई मनाला , सरी रिमझीम  ,मेघ बससूनी ... वेडावल्या भावना वेडावली प्रित गाणी ... मनात साठवले क्षण ते जे गेले स्पर्शुनी , मोहरून आली कळी उमलली प्रेमानी ... ओजंळीत शब्दांच्या प्रेम पाहे काळजात तरंगूनी , वलय तुझी आता माझ्या भोवती भासावानी ... प्रतिबींब आरश्यात तुझे तूच डोकावे मनातूनी , नजरेला गेली नजर खूप काही सांगूनी ... हर्ष नवा मनाचा सुख हे आले स्वर्गातून चालूनी , काटेरी वाट जरी घेई मन आकर्षूनी ... जगने वाटे नव्याने आली ओली सांज जीवनी , मेघ बरसले छंद हा आभाळाचा पांघरूनी ... वेडावल्या भावना वेडावली प्रित गाणी ... साद घाली मनाला , सरी रिमझीम , मेघ बरसूनी ... वेडावल्या भावना वेडावली प्रि...

सौदर्यं तुझे आरसपाणी...

  चिंब भिजलीस तू हिरव्या माळराणी , वाहणारे पाण्याचे लोट गाते तुझी गाणी , श्वास लागला थरथरायला ऐकून तुझी वाणी , थेंबा थेंबात तुझी कांती सौदर्यं तुझे आरसपाणी ... गारवा कुंतलांचा वाराही शहारल्यावानी , ओघळत्या सरी गाणार रुपाची गाणी , ओलीचिंब झाली बरसात ऐकून तुझी कहाणी , शब्दाविन बोलल्या जातील तु प्रित राणी ... पावसाला बघ आली चमक मोत्यावाणी , स्पर्शिता तुला बेधूंद झाला मनी , पाहून तुजला मीही भिजलो या क्षणी , सावर या क्षणाला निसटत आहे ओंजळीतून पाणी ... हसून थांबलो मी त्या वळणी , मन मंजीरी तु उभी छत्री घेऊनी , बरसू दे त्या मेघाला तहानलेली धरणी , तृप्त होईल येईल हिरवी जरी नेसूनी ...

जोडीदार माझी तू ...

  अश्या पावसळी चिंब बहरूनी आली , सांज तु  ,माझ्या स्वप्नात न्हाली , रंग जराशी सोडून गेली , त्यावरी , पावलांची माझ्या ठसे उमटली , जन्मजन्मांतरीची साथ तुला मागीतली , हृदयाने माझ्या हाक तुलाच दिली ... जोडीदार माझी तु , निवड तुझीच केली ... हृदयाने माझ्या हाक तुलाच दिली ... धूंद चाफ्या कळ्यांना प्रित लाजवूनी गेली, शुभ्र चांदणी जराशी ढगाआड गेली, कोरीव कोर तेथेच लपून बसली , अशी लावण्या तु , ना त्यांनी पाहली , निज निज रात्री, तुला का? जाग आली ... हात हातात घ्यावा ,ओढ तुझी मनी लागली ... हृदयाने माझ्या हाक तुलाच दिली ... जोडीदार माझी तु , निवड तुझीच केली ... हृदयाने माझ्या हाक तुलाच दिली ...