पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सांग रे सुखा...

  सांग रे सुखा तुला काय? हवे , एक स्वप्न डोळ्यातले , की आयुष्याच्या तडजोडीचे दुवे ... सांग रे सुखा ... सांग रे सुखा तुला ही प्रिय आसवे, गाठले ध्येय पूर्तीतले ., की तडजोडीचे अध्याय नवे ... सांग रे सुखा ... सांग रे सुखा जना मनी समाधान हवे , याच पर्यायी दुःख थांबले , की तडजोडीने घेतले सवे ... सां ग रे सुखा... सांग रे सुखा आयुष्य म्हणजे तडजोड भावे , तुझे थोडेसे माझे थोडेसे , ऐकमेकांत मिसळून घ्यावे ... सांग रे सुखा ...

आभाळ भरून आलं...

  आभाळ भरून आलं , पाणी डोळ्यांतून वाहलं ... गरजुन गेले मेघ इथे , विज मनावर पडली , करपून गेले प्रेमांकुर , बीजे मोडीला गेली ... आभाळ भरून आलं , पाणी डोळ्यांतून वाहलं ... दुष्काळ झाला नशिबाचा , का कोपला असा तू , कोणता नवस करू तुजला , पावशील तेव्हा भक्ताला तू ... आभाळ भरून आलं , पाणी डोळ्यांतून वाहलं ... नीज पारखी झाली उशाला , रात्र दिवसा परी जागली , पापणी टेकत नाही पापणीला , अशी अवस प्रेमात आली ... आभाळ भरून आलं , पाणी डोळ्यांतून वाहलं ... प्रीत सरी कुठे लपल्या , भेगाळल्या प्रेमाच्या वाटा , चिरा-चिरा धरणीला , उसळला जरी समुद्रात लाटा ... आभाळ भरून आलं , पाणी डोळ्यांतून वाहलं ...

गाणे ओले केले...

  सरींना शुष्क करून तिने शब्द ओले केले , तुच सांग परी कसे माझे गाणे ओले केले ... मुकी होती वाचा तिची  डोळ्यांतून बोलले , तिच्या शुभ्र कांतीने चौफेर धुके ओले केले... झिरीमीरी सांजेची लाली गाली तिच्या आली, सूर्यही ढगाआळ होता धरणीला ओले केले ... अंधारून गेली जेव्हा रात्र तेव्हा रात्र संगतीला, दुःख डोळ्यातून वाहून उश्याला ओले केले ... ओलांडले माप उबंर्‍याचे सोबती ठसे कुंकवाचे, सौभाग्याचे लेणे लेवून माहेर ओले केले ... कंपीत स्वर सुस्वरला सवे तालही दिला त्याने, सुस्वरात गाऊनही कोकिळेने डोळे ओले केले... सरींना शुष्क करून तिने शब्द ओले केले , तुच सांग परी कसे माझे गाणे ओले केले ...

मायानगरी...

  ही दुनिया एक मायानगरी बघा ... नाशिवंत जीवाची हिररी बघा ... हव्यास मनाचा वाढला किती, स्वप्नवत मनाचा मनोरा बघा ... मृगजळ वळणा वळणावर इथे, पूर्ण भिजूनही उरला कोरडा बघा ... सुंदर पडलेलं स्वप्न हे इश्वरी , माया गुंतलेली भावपसारा बघा ... एका क्षणात होत्याचे नव्हते , अस्तित्वाची लढाई जोरदार बघा...

लाईट कॅमरा अँक्शन ...

 सकाळ होताच तिच्या अभिनयाची सुरवात होते , लाइट कॅमेरा अँक्शन म्हणून दूखणी लपवत होते ... कालचा घाव मनाला नवऱ्याने दिलेला बघ , मन सलते राहून राहून तरी मुलासवे हसत होते... नौकरी करतांनाही नशीबात कुठे असते सुख तिला, घरचा व्याप सांभाळून तीथेही तेवढीच कार्यरत होते... तूही असतो तेवढाच तत्पर दुःखास लपवण्या , पण तिची तारांबळ उडतांना सर्वच पाहत होते ... सुधार होतोय जरा कासवाप्रमाणे समाजात तरी, अजून खुपच वाव बाकी आहे तुलाही समजत होते ... शिकव तिलाही तुझ्यासवे अशिक्षीत नको राहू देऊ , लुगड्याचा पदर खोचून तुझ्या बरोबरीने राबत होते ... सकाळ होताच तिच्या अभिनयाची सुरवात होते , लाइट कॅमेरा अँक्शन म्हणून दूखणी लपवत होते ...

मला तेव्हा जाग आली...

  मला तेव्हा जाग आली ... डोळ्यांत स्वप्न भिजता रात्र जागवुनी गेली , निथळून गाली ओघळता मला तेव्हा जाग आली ... आसमंत निजला चांदण्या रात्रीच्या उराशी , कवडसे चंद्राचे पापण्यावर मला तेव्हा जाग आली ... स्वप्नातली रातराणी गंधाळून मनास गेली, मन सुगंधाने नाहता मला तेव्हा जाग आली... काजव्यापरी चमकते स्वप्न मनात लपून बसली, एकांती आठवांच्या भेटता मला तेव्हा जाग आली... हळूच शब्द ऐकता काव्यसर कशी बरसून गेली, छंद माझा कागदावर उमटता मला तेव्हा जाग आली... सखा सोबती तो त्याच्यासवे सप्तपदी चालली, घेतला उंच झोका मनीषेने मला तेव्हा जाग आली ... सौ. मनीषा आशिष वांढरे...

ना कळले...

  धूर्त वेळेचे गणित ना कळले , मोजले श्वासांवरी ना कळले... फुलपाखरां सारखी रंग सांडले, बोटावरी हलकेच ना कळले... मिटलेल्या पापण्यांना दाटूनी आले, हूदंका ओठावरीच ना कळले... मी तीला कायमचे गमावले, पायवाट जीवनाची ना कळले... मृदूशय्याही आता बोचते रात्री, कुस प्रेमाची पलटली ना कळले... मातीत पुरल्या जाता आठवणी, आठवणी मनात उरल्या ना कळले...

अनामित भाव...

  नात्यांचा गोडवा हा शब्दांत बांधला का ? मागे उरला अनामित भाव मनाचा ... पाखरापरी सजला पंख फुटताच उडला , काळ गोठणारा अनामित भाव मनाचा... शब्दं मुका कधिचा डोळ्यांतच हसला , राखेखाली धूमसला अनामित भाव मनाचा... ओठांच्या दाळिंबांना रंग लाल लाल चढला, हुंदका गळ्यांतच दाटला अनामित भाव मनाचा... जाग आली जाणिवेला स्पर्श कसा भिजला , डोह मौनाचा साचे अनामित भाव मनाचा... नात्यांचा गोडवा हा शब्दांत बांधला का ? मागे उरला अनामित भाव मनाचा ...

आभाळ...

  ढग ढगांच्या मागे धावु लागले , ऐकमेकांत भिजले ओथंबुन निघाले ... ते हलकेच विजेचे ताशेरे ओढले  , व्याकूळ मनास अनामिक घोर लागले ... आभाळ भरगच्च भरून आले , सुरमधूर स्वरात सरींने गायले... मृदुगंध मातीचा श्वासातून मोहरले, लयीत वलयांकित प्रतिबिंब झुलले ... सिमा नाही प्रेमाला जे पृथ्वीनी दिले, हिरव्याकंच कायेवर जीवन फुलले... आभाळ मनाचं मनावर बरसले, प्रेमात तुंडूंब मन दुःखातही हसले... ढग ढगांच्या मागे धावु लागले , ऐकमेकांत भिजले ओथंबुन निघाले ...

व्यक्तिमत्व...

  समाजाने युगांयुगे माझी किती कुचंबना केली , सुंदर सुशील शांत व्यक्तिमत्व अशी अवलंबना केली ... हासत लाजत सार काही मुकाट्यांने सहन करणार , पेटून उठले अन्याया विरुद्ध तर यांनीच लांछना केली ... तो कोणता चित्रकार  ज्यांने ओंजळीत फुले दिली, हाती घेतले शस्त्र तर माझीच मागे प्रतारणा केली ... वाचा फुटत चालली आता अन्याया विरुद्ध कुठे कुठे, हे माणसा मीही माणुसचना बघ तूने सात्वंना केली ... करूया समान हिस्सा अधिकारांचा या विश्वामध्ये , मगच मिळेल सम्मान जगण्याचा ही आराधना केली ...

ध्येय...

  शिक्षणातून साध्य होत जाणारे ध्येय , अपार कष्ट घेऊन वेडावणारे ध्येय ... जीवनाचा महत्वाकांक्षी टप्पा हा , सर्वस्व पणाला लावून गाठणारे ध्येय... करिअर म्हणतात याला ठरवून दिशा , जीवनात हेच पारितोषीक मिळवणारे ध्येय ... पायमल्ली अभ्यासाची करता अभ्यास वाढवा , माणूस म्हणूनही समृद्ध व्हा शिकवणारे ध्येय... परिपक्व विचारांचा माणूस तुटत नाही , कितीही संघर्षमय वाटा पार करणारे ध्येय ...

अपूर्ण स्वप्ने ...

  या कोमल तनुवरी स्पर्श घसरतो असा, ओला दव प्रेमाचा निखळतो जसा ... चांदण हळूवार चमकणार आकाशी , रंग रातीचा डोळ्यात दाटतो जसा ... फुलाच्या गर्भात मकरंत लपलाय , भुंगा गोडवा प्रितीत चाखतो जसा ... येतो अचानक प्रवासी कुठला बागेत, पडता नजर फुलावरं खुडतो जसा ... आयुष्याची अपूर्ण स्वप्ने त्या फांदीवरी, ती आठव फुलतांना वृक्ष रडतो जसा... हरवते वाट सापडते पुन्हा जगण्याची, जीवन रेतीच्या पाऊलखुनांचा वसा जसा...