चेतावणी...
अशी घाई करू नको ना मना , सांभाळ जरा स्वतःला मना... वळण ही निखारे विखारी , पोखरून निघे तुझे पाय मना ... चेतावणी तुला पहिलेच माझी, आसवांनी सुरू ही कहाणी मना... नदीत बुडाले कुणी या नादात, नाव मोठे होई तरी विरहच मना ... नको हा रस्ता नको ही वळणे , आताच थांब समोर ना थांबा मना... बघतच तुला रात्र होते उषाही अशीच, नावी तुझ्या जीवण सारे केले मना... चंचल तू सुगंध सोनचाफ्याचा , मोहून घेतलेस आता हाल विरातोय मना... अशी घाई करू नको ना मना , सांभाळ जरा स्वतःला मना...