पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक पान ...

 कूठल्या तरी वाटेने तु येत होता , भरल्यां डोळ्यांनी मज निरोप देत होता ... पान एक शेवटी फांदी धरून , साजंवारा तया सोबत गूणगूणत होता ... उरलेला त्राण त्या देठात ओतून , एकांतात आठवांचा उत्सव होता ... कुणी जाळले निखारे वृक्ष पायथ्याशी , झूंज अखेरची धुरा सवे देत होता... वाट होती तयाला येईल वसंत , झडलेल्या पालव्यांना खुणावीत होता ... आस ना सोडली त्यांने शेवटपर्यंत , तो शेवटी गळला तेव्हा पानांना बहर होता ...

सकाळचे स्वप्न ...

  सकाळी सकाळी सुगंध मोगर्‍याचा आला , स्पर्श तुझ्या आठवणीचा क्षण हळवा झाला... काकणात गुंज त्या स्वरांची झंकारीते प्रिया, मखमली बाहूवरून लडीवार प्रेमदवं घसरला ... सकाळचे स्वप्न ते गोड आताही मज छेडते, प्रेमाचा श्वास घेऊन तु गेला मजसवे भास उरला... आठवांना स्वप्नात बघते बघून हसते , ज्या उरल्या प्रेमकळ्या सुगंध त्यांचाच श्वासात भरला... नाही अट तू ये परतूनी मजपाशी कधी, अर्ध्यावरतीच कसारे जीवनाचा हात सुटला...

चंद्रपूर ...

 सुर्याचा वाढवून पारा , उन्हाला बघा इथे जाग येई , नाव चंद्रपूर जरी , गरमीचा तडाखा इथे सोसला जाई ... महांकालीच कुळदैवत , कोळश्याने भरल्या खाणी , जरी शहर लहान माझं तरी ,थोरा गरीबांला रोजगार देई ... ताडोबाची स्वारी करता  ,डोळ्यांना होई व्याघ्र दर्शन , जीवाचा ठोका  चुके , बघता रूप रौद्र देखण ऐटीत बाई... गोंडराज्याचे साम्राज्य चांदागडावर , सांगण्या ऐतीहासीक वास्तु उभ्या . , स्मरणार्थ प्रेमाचे प्रतिक समाधी , आठवण करून देई राजा बिरशहाची आणि राणी हिराई ... महांकाली आहे जागृत देवता, यात्रेसाठी येती लाखो भक्तगंण , असं काळ्या सोन्याचे शहर माझे , भक्त माती कपाळी लेई ...

मनाचा संघर्ष...

  रोजचा दिवस सारखा नसते , काल पावसाळा तर आज उन्हाळा असते, चालला होता मनाचा संघर्ष जीवघेणा काल , आज संघर्ष मनाचा बहणा असते ... वाटत होती जी काटेरी वाट चालतांना, पाय रक्तबंबाळ झाले होते , आज पडता गाठ त्या ध्येयाशी , मनाला काटेरी वळणाचे अप्रूप वाटत असते ... तिच्या नजरेतला तो किती प्रेमळ , आभाळी भरलेला ढग जणू, बरसता तो तिच्यावर मुसळधारपणे , सर्व वाहून नेणारा पूर असते ... काटा सरकता घड्याळीचा , वेळही समोर समोर वेगाने पळते , मागे राहून गेलेल्या आठवणींना उजाळा देण्या , वेळ पून्हा मागे वळत असते ... काल लिहूण ठेवलेल्या कवितेचा , आज  भावार्थ वेगळा भासते , चारोळी रचते मन ओघा ओघाने  , तिला कवितेचा साज  चढत असते ...

सुखी संसार...

  नको ऐश्वर्यांचा साज नाही पैशाची बरसात , दुःखात मिरवू सुख तुझ्यामाझ्या सूखी संसारात ... एका घडीला जाणे एका घडीला येणे , घडी घडीचे घेणेदेणे तुझ्यामाझ्या सूखी संसारात ... फाटक्यां वस्त्रा मध्ये भावना जपून ठेवीन , फाटका काठ शिवून जपने तुझ्यामाझ्या सूखी संसारात ... चिमणी चिमण्यांचे चाले प्रयास घरटे उभारण्या , काडी काडी जमवू हिंमतीने तुझ्यामाझ्या सूखी संसारात ... संसारात चालतांना उपसावे लागे कष्ट रस्ता कठीण , समजून घेऊ ऐकमेंका आयूष्यभर तुझ्यामाझ्या सूखी संसारात ...

शुर योद्धा...

  रंक्त सांडवता विर भारतभूमिवर , प्राण त्यांने त्यागीला , लढला तो असा शेवटच्या श्वासासवे , शुर योध्दा तीथे उरला ... जो सांडला थेंबाथेंबातून , ओसंडून वाहत होता सीमेवर , शूर  योद्धा तो मातीतला , आकाशाला फाडून गर्जला... हळूवार जपल्या त्यांने आठवणी, काळजांच्या काळजात , शूर योद्धा तो हळवा पण, हृदयात भरून देश देशप्रेमात रंगला... उमटता वर्ण त्यां गोळ्यांचे , दाविते लोकांस उरभरून गर्वाने , छेदिले असते गोळीने छातीला , फिरलो नसतो मागे जरी डाव भंगला ... मातीत खेळलो मी बालपणी ,मातीच लाविली ललाटी बघ , मातीशींच लग्न लाविले , मुंडावळ्या बांधून शूर योद्धा धन्य जाहला...

सीक्रेट मिशन...

  माझ बाई सीक्रेट मिशन , सीक्रेटच असते , मी सांगते ऐकीला , कसं काय? गावभर पसरते ... विचारले तिला तर  ती , उलट मलाच बोलते , विश्वास नाही का ? माझ्यावर , मि काय? गावभर पसरवते ... तिच्या प्रश्नांच उत्तर माझ्याकडे नसते , म्हणून मी चूप बसते , जर इने सांगितले नाही कुणाला मग असे वाऱ्यांसारखे कसे काय? गावभर पसरते ... तो येऊन म्हणाला मला, कशी गं तू आपले ठरले ना , स्वतःच्या पायावर उभं होऊ मग आपल्या नात्याला नाव देऊ पण आताच कसे हे गावभर पसरते ... चिडून त्यांच्या आईने , घर माझे गाठले बरं का? लहान आहे आपले मुले , आताच सावरा बरं का? नाही तर हे गावभर पसरेल ... तेव्हा पासून माझ्या आईने , मल उंबरठाही ओलांडू दिला नाही , त्याचा फोनही बंद असला तरी , मी आणि तो भेटला हे गावभर दिसते ... आता ठरवले बाई  ,कुणाला काही सांगायचे नाही , पण पोटात दुखले की , आपोआप सिक्रेट मिशन गावभर पसरते ...

मैत्री की प्रेम...

  का ? गं तुला प्रश्न पडतो नेहमी , तुझं आपले प्रेम की मैत्री नेहमी... प्रेमात मैत्री नसते का? कधी , समरस होत जाते प्रेम मैत्रीत नेहमी... जीवन तुझे आहे गीत गाण्या, प्रेम माझे राहील सजवण्या नेहमी... आधार वाटतो मला तुझ्या असण्याचा, प्रेमात सर्वस्व अर्पूण देण्या सज्ज नेहमी... तु दिसताच स्पंदने खुलते गुलाबापरी , मैत्रीचा हात तुझा प्रेमाची साथ नेहमी... ओळख आता मैत्री की प्रेम असे, मैत्रीची सोबत निरंतर प्रेमाचा हात नेहमी...

नात्यांला नाव...

  या नदीच्या काठावर मी बसले होते , निर्मळ त्या पाण्यावर रुसले होते... वाऱ्यांशीही कट्टी तरी सांगा त्याला, ते खळाळत पाणि नदीचे तालात होते ... रेतीचा फसवा राग रेतीतच विरे , तो किनारे लालबुंद नदीचे प्रेमात होते... तो अज्ञात व्यक्ती किती हुतूहल मला, रोज त्यालाच पाहण्या तातकळत होते... शब्दांशी गट्टी कधी केली नाही त्याच्या, फक्त डोळ्यांला प्रेमाचा आसरा मागत होते... नकार ना होकार फक्त नजरेचा खेळ , नात्यांला काय? नाव द्यावे मन हिनवत होते... या नदीच्या काठावर मी बसले होते , निर्मळ त्या पाण्यावर रुसले होते...

ओळख...

  हरवल्या त्या पापण्यां शोधते ,ज्यात स्वप्न माझे होते , आज भेटता डोळ्यांस डोळे , अनोळखी स्वप्न माझे होते ... स्वतःची ओळख सांगावी कशी, ओळखीच्या माणसाला, डालवून गेला सुंगध मोगरा , सुंगधी क्षण गंधाळले माझे होते... शब्दं माझे समजण्या पलीकडले , त्याला ना समजले, समजून उमजून केले प्रेम मी , अश्रू वाहवत डोळे माझे होते... काव्यात ओवते मी आता , शब्द जो अलवार ओठांत , ओठंच शिवले त्याने , मुके शब्द अवंढा गिळत माझे होते... लिहीताने जरा कचरते मीच, अंतरंगात उठले काहूर, न्याय मिळेल का? स्पंदनांना माझ्या, हृदयात ज्या माझे होते... कळत नाही त्यांना मी लिहून ठेवले, जे कागदांवर कधीचे , तु समजावून सांगना , हे शब्दंच आता जीवन माझे होते...

अरेरावी...

  अरेरावी... प्रेमात होती बघ आपल्या हक्काची अरेरावी , भासलेच ना मला ती संशयी मनाची अरेरावी... तु माझीच फक्त दुसऱ्यांचा नको स्पर्श वारा, प्रेमाची भांडणे गमतीने घेतली बोलाची अरेरावी... माझ्यासाठी तूच जग माझे सांगून थकले, का? कळत नव्हते तुला तुझी मीची अरेरावी... ओलांडली नात्याची सिमा जेव्हा हात उठला, भंगले मी तुकड्यात जेव्हा प्रेमात संशयाची अरेरावी... तोडल्या तु स्वप्नकळ्यां उमलायच्या आधिच , नको होती मला या असल्या प्रेमाची अरेरावी... कोलमडून पडल्या त्या पारिजातकाच्या फांद्या, सुंगाधित होता कधी तुझ्या अंगणात ऐकत ती अरेरावी...

आस डोळ्यांत जागवी...

  काजळी रात्रीची पीड रात्रभर , आस डोळ्यांत जागवी... चांदण्यां रात्रीची सल रात्रभर ,  आस डोळ्यांत जागवी... मिरा मी सख्या तुझी, गाते गीत प्रेम आराधनेत, दर्शनास तुझ्या आतूर रात्र , आस डोळ्यांत जागवी... तुला नाही जाण या मनाची, मी कधी ना तुज बोलले, एकतर्फी प्रेम हे माझे स्वप्न, आस डोळ्यांत जागवी... दोष ना तुझा ना माझा, विवश भावनेने केले स्तब्ध मला, तूच स्पंदनाला श्वास हा अट्टाहास , आस डोळ्यांत जागवी... सरकते त्या चांदण्यांचे निखारे , विरह जळतांना उशाशी , ओल्या उशीचे आक्रंदने मज, आस डोळ्यांत जागवी...

अश्रू वाहून गेलेले...

  डोळे होते दुःखावलेले , अश्रू वाहून गेलेले , कळले ना मला कधी , अश्रू वाहून गेलेले... स्वप्ने पाहिले ज्यांच्यासाठी , घाव दिले त्यांनी, रंगवलेल्या वाटेवर कधी ,अश्रू वाहून गेलेले... प्राण होता जो , तो प्राणच माझा निष्प्राण , उसवलेल्या श्वासांत कधी,अश्रू वाहून गेलेले... वसंत दूर्धर ग्रासलेला, श्रावणही खंडीत , बसरणाऱ्यां श्रावणात कधी ,अश्रू वाहून गेलेले... विरह जीवघेणा हा, का ? अश्रूचे नाते हे, जोडून तोडले मनाने कधी,अश्रू वाहून गेलेले...

विषय...

मनाला दिलेली साद...

  मनाला दिलेली साद... ऐकली ना तु मनाने मनाला दिलेली साद , कसे सांगु तुला सख्या कुठवर आली याद... पायरी ती उबंरठ्याची कधी ओलांडली नाही, उंबराही हिनवे मला सांजप्रहरी का? केली याद... पालापाचोळा जीवनाचा उन्हाच्या झळेने वाळला, पाय ठेवता आक्रंदते पर्ण अजूनही ओली याद ... तुम्हास काय? ठावुक कधी मी दाखवलीच नाही, रोज पडे चिरा काळजाला जेव्हा निघते तुझी याद ... त्या पुस्तकाची पाने जेव्हा जेव्हा चाळते मी, सुकलेल्या गुलाबांचा सुगंध करून देते तुझी याद... करेल का? कुणी माझी आठवण सदैव मनात , जेव्हा वाचेल माझी रचना उफाळून येईल याद... विसरले मी सारे मनास वारंवार सांगते बघ , आता नको वेदनेचे पहारे म्हणूनही येते तुझी याद...

मन तुझ्याच दिशेने चुकते...

  नाही नाही म्हणता वाट तुझ्याच दिशेने चुकते , चुकल्या वाटा पूर्वीच्या तरी मन तुझ्याच दिशेने चुकते... धागा गुंतला सोडवायला जाता जाता पुन्हा , तुटता गाठी पडल्या तरी मन तुझ्याच दिशेने चुकते... फांद्या तुटता पक्षी उडाले घरटे सोडून , तुटलेले घरटे रडवेल तरी मन तुझ्याच दिशेने चुकते... हरल्यावरही जिंकण्याचा अनुभव का ? देते, तुटलेल्या मनाच्या खुणा तरी मन तुझ्याच दिशेने चुकते... मी त्याला पुन्हा पुन्हा भेटते कळते तरी चुकते , चुकलेलं मन हळहळते तरी मन तुझ्याच दिशेने चुकते...

त्याच ढाब्यांवर...

  चल ना आज भेटू आठवांना पुन्हा जुन्या त्याच ढाब्यांवर , कँडल लाइट डिनर करू लाईट जाता त्याच ढाब्यांवर ... श्वापदांचे आवाज कर्कश मन विचलीत घाबरलेले, प्रेमाची कळी मनात फुललेली उमलु पुन्हा त्याच ढाब्यांवर... शिवार काळोखाने भरलेलं आकाशात चांदणे पसरलेले, दिवाना मौसम पून्हा खूणावत आहे चल त्याच ढाब्यांवर... मेघ आपापसात होते गर्जत सोबतीला विजांचा तांडव , मनातही वारा सुसाट त्यावेळेस चल पुन्हा त्याच ढाब्यांवर... आयुष्याच्या मध्यात येता येता बघ झिजून गेलो आपण, स्वतःतचं विसरलो स्वतःला भेटाया पुन्हा चल त्याच ढाब्यांवर...

मायेच माणूस...

  ती हंबरते दिसता तिचं मायेच माणूस  , वासरासारखं प्रेम करते दिसता मायेच माणूस ... जीवाशिवाची जोडी राबते उन्हातान्हात, पोळा येताच देतो अनंत धन्यवाद मायेच माणूस... तो रक्षण करतो घराचे परक्यांस अडवतो, शेपटी हलवत लाडात येतो दिसता मायेच माणूस... म्याऊ म्याऊं करत चाखते वाटीतले दूध, गोजीर रूप तिचं जीव लावते तिला मायेच माणूस ... पक्षी असूनही आवाजात माणूस बोलतो , ज्यांच्या घरी असतो बोलून जोडतो मायेच माणूस... प्राणी प्रेमाने असते एकनिष्ठ नेहमीच माणसांशी , प्रेमाने प्रेम जोडत जाते जगी मायेच माणूस ...

देव...

  देव ... जेव्हा मी खचते, माणसांवरून विश्वास उडते तेव्हा मला जगण्याचा आधार वाटतो तो म्हणजे माझा देव... कशाही परिस्थितीत तग धरून रहायची हिंमत देते , अपयशाने न खचता पुन्हा भरारीसाठी सज्ज ज्यांच्या विश्वासावर होते तो म्हणजे माझा देव ... माझ्या साठी तो सदैव आहे मला प्रेरणा देत, जगण्याचे बळ देत ज्याच्याजवळ मी मनातली कोणतीही गोष्ट बोलते, एकटीच भांडते, चर्चा करते, तोडगा काढते तो म्हणजे माझा देव... मला माहिती आहे जे त्या दगडावर विश्वांस ठेवत नाही ते देवही माननार नाही, माझा आग्रही नाही पण जी गोष्ट तुम्हाला पडतांना सावरते , चुकल्यावर अनुभव देते, जिंकण्याची ताकत देते, तो दगड असो की माणूस , पशू प्राणि वृक्ष काहीही , तो माझ्यासाठी माझा देवच आहे... माझी माझ्या गजाननावर असिम श्रद्धा आहे ज्या परिस्थितीत मी व्यथित होते किंवा मला परिस्थिती सांभाळता येत नाही अशा वेळेस मी सर्व त्यावर सोपवते आणि मला मार्ग सापडतो ... कदाचित तो मार्ग माझा मलाच सापडत असेल पण जेव्हा मी पूर्ण शरण जाते तेव्हा माझ्यातली मी मला नव्याने सापडते आणि हाच माझ्यासाठी माझा देव आहे ... या रोबोटिक जगात जेव्हा सर्व कामे...

माझे हरवते भान...

  नक्षत्र तुझ्या डोळ्यात ,पाहता हरवते भान , त्याच चांदण्यातुनी चालतांना, माझे हरवते भान... पाकळ्या गुलाबी मऊ, ओठी स्वरचल्या , गालाची खळी उमटतांच , माझे हरवते भान... गळ्यात कंठी मोत्यांची , कर्णी मोत्यांच्या कुड्या, चमक उठता डोळ्यांत मोत्यांची , माझे हरवते भान... काकणांची कट्टी मनगटांशी, किनकिन करे फार, लाजता झूरता ती अशी डोळ्यांत,माझे हरवते भान... किती छळशील प्रियाला , सांग त्या रेशमी बटेला, वारा शिरता कुंतलात रेशमी,माझे हरवते भान... काया सुवर्णापरी लखलखणारी, त्यावरी अदा जीवघेण्या, हर अदा देखीता सल हृदयात,माझे हरवते भान...

अभिमान...

  मी माझा सार्थ अभिमान आहे , स्वाभिमानासवे जागृत अभिमान आहे ... रक्त मराठी सळसळते मराठ्यांचे, महाराष्ट्र जन्मभूमी माझा अभिमान आहे... सह्यांद्री सातपुडा रक्षणार्थ उभा , गोदावरी कावेरीचा जलअभिषेक अभिमान आहे... ज्ञानेश्वर तुकाराम मुक्ताईचा संत संग, डॉ. बाबासाहेबांची विद्वत्ता अभिमान आहे ... छत्रपती शिवरायांचे आम्ही लेकरे सन्मान, बोलतो मराठी आमच्या वंशाचा अभिमान आहे ... आया बहिणींचा करा आदर ही शिकवण, भावा बहिणींच्या नात्यांचा अभिमान आहे... कारभारणींची शिदोरी कारभाऱ्यांचा दंड पिळदार, स्व :कर्तृत्वाचा शिलेदार उभा अभिमान आहे... मी माझा सार्थ अभिमान आहे , स्वाभिमानासवे जागृत अभिमान आहे ...

सांग ना मला...

  रूप माझं न्याहाळतोस सांग ना मला काय दिसतेय , पाहतोस का तो शुभ्र चंद्र सांग ना मला काय दिसतेय ... ती पिवळी सकाळ कोवळी ओलावणारी दवं अबोली , रेशमी मऊशार शलाका सांग ना मला काय दिसतेय ... रुपेरी वाळूत उन्हाची झळ शुष्क वाऱ्यात तुषार खारा , किनारा तू खुणावणारा सांग ना मला काय दिसतेय ... स्वतःतच गुरफटलेली मी कळून सुद्धा न कळलेली मी , बासरीचा सूर तरीही पोकळ सांग ना मला काय दिसतेय ... ती हिरवी धरणी लता लतिका यांनी सजलेली ध जलेली मी , बंधनात तरी बंधने तोडणारी मी सांग ना मला काय दिसतेय... प्रकाशमय जग माझे स्पंदना चा गजर करते मांदियाळी जग , या डोळा दर्शन तू ईश्वरी करतेस सांग ना मला काय दिसतेय... घडविली त्या ईश्वराने तरीही मला पाहता पेचात ब्रह्म पडते , काय घडवले मी या सुंदर हाताने सांग ना मला काय दिसतेय... मी मंद प्रकाश किरणांचा स्मित रहस्यमय धारा बरसणाऱ्या , उगम माझा कुठे कधी कसा ना कळते सांग ना मला काय दिसतेय... तो रंग निळा पिवळा गुलाबी नारंगी त्यावर रंग माझा चढते , हरवते मी माझ्यातच तरी तुझ्यात उरते सांग ना मला काय दिसतेय... त्या तारका पदरात भरूनी ओंजळ रिती आसमंती कर...

ऐश्वर्यांची गुढी...

  चैत्राच्या उंबरठ्यावर ऐश्वर्याची गुढी उभारू , विश्वास प्रेम आपुलकीसोबत संवादाची गाठी बांधू... हर्षास मारक चिंता निराशा उणेदेणे मागे टाकू , अडगळ सारी बाजूला सारून प्रगती किर्ती यशाची निव टाकू... घेऊया कवेत आसमंत सारा असा पसारा मांडू , धरतीलाही गर्व होईल असे मातीत संस्कार पेरू ... मावळतीला क्षितीजांच्या रंगास पाण्यात मिसळू , अध्या खेळू रंगीत सागरलाटा त्यात अंग अंग भिजवू ... आतूर होईल श्रावण असा खेळ खेळाया उन्हांचा , मृगजळही पाझरेल असा चटक्यांना गारवा मनाचा देऊ ... चैत्राच्या उंबरठ्यावर ऐश्वर्याची गुढी उभारू , विश्वास प्रेम आपुलकीसोबत संवादाची गाठी बांधू...

गंमत...

  सगळ संपल आता ,जाता जाता ती म्हणाली , डोळ्यात पाणी आणि तू काळजी घे ती म्हणाली ... मला कळलचं नाही काय ? झाले , जरासा गोंधळलो, काय? चुकले माझे सांग ना , काहीच नाही ती म्हणाली... आता पूर्ता मी स्तब्ध झालो , कूणी काही बोलल का?, सर्वांनी संम्मती तिली आपल्याला मग , शून्यात ती म्हणाली... डोळ्यांना सोसवेना तिचे भाव, काळजात सलला घाव, प्रेम करून चुकलो का? मी, पाठमोरी होऊन ती म्हणाली... आता कोसळणारंच , त्या पांढऱ्या फरशीवर तेवढ्यात , हसून बिलगली जोऱ्यात बोलली ,एप्रील फूल ती म्हणाली ... जीव जायचा वाचला माझा, नको रे बाबा हा जीवघेणा खेळ, खोट बोलून कसली गंमत , अरे गंमत केली ती म्हणाली ...