आशा ...
अंधार जरी दाटला आज , मनात नाही खंत , अदृश्य किनारा आज , तरी मनात नाही खंत ... दरीवरून कोसळले मी ,वाटले स्मशानात गेले, जीद्द अजूनही कायम , जरी दुःखास नसेल अंत ... मनात इच्छाचा डोंब उसळलेला , वेळ अपुरा , संसारात राबते खुशीत , छंद लिखाणाचा भासे संत ... क्रोधात चुकते अनेकदा , विचारही होते अभद्र , तुझ्या साथीने जीवनाला बहर , मन माझे तुझा प्रांत ... पहाटेची कोवळी रेशीम , स्पर्श गालाला करते , हसते मी मनात , हीच खरी उद्याची आशा निवांत ...