गैरसमज...
पाण्यासारखे जीवनाला , नित्यं वाहू दे ,
साचवु नको गं सखे,ठैराव मनातच राहू दे ...
पाझर तो मायेचा डोंगराला , तूला ना कळला,
आता कोरड्या बाष्पाचा , उकाळा राहू दे ...
घननिळ दाटला डोळ्यांत , तुला मृगजळ भासे ,
माझा दोष नाही आता ,संवादातला रस राहू दे...
समजून घ्यायचेच नव्हते तुला , तोडली तु नाळ,
गैरसमजाने गैर केले, आता आपलेपण राहू दे ...
गुन्हा माझा नाही , दोष तुझाही नाही सखे ,
विश्वास कमी फक्त, आता नवे बहाणे राहू दे ...
पाण्यासारखे जीवनाला , नित्यं वाहू दे ,
साचवु नको गं सखे,ठैराव मनातच राहू दे ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा