पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चार भिंती...

  चार भितींचा आडोसा जेव्हा मिळाला , आनंद किती झाला या मुक्या मनाला ... पाझरले कधी बाष्प प्रेमाचे जेव्हा , भिंती ओलावल्या दव उमटून आला ... कधी अवरोध केला उन्हांच्या चटक्यांना , सावली स्तब्ध देऊन जीव लावला तयाला... होईल भारांचे पिसे नको सांगु मनाचे गुढ यांना , निष्प्राण भिंती तरी कान दुःख ऐकावयाला ... उबंरठा सदैव देई पहारा तरीही शत्रू तेथेच आला , बघ लाऊनीया दार आता दुःख लावले परतीला ... डोकावुनी गवाक्षातून चंद्र प्रितस्पंदनाने येऊ पाहतो, कुणी सांगा त्याला नको हूरहूर लावू तरण्या जीवाला... कुंचला रंगात बुडवूनी घेतला मनाच्या आवडीचा, विट विट बोलली पहा "अरे वेड्या तु जीव ओतला "... थांबू इथेच की पुन्हा गुंफू कवितेत मन शब्दांना, सुचून येता लिहायला जसा वारा वाहे मंतरलेला ... वाटते आता गीत व्हावे माझ्या शब्दशब्दांचे , सूरताल मिळता पूर्णत्व येईल माझ्या गाण्याला... असेल क्षितीजाला उभी ती  दूर वाट पाहे , गित गात असेल विश्व सारे मांडले जे तू थाटणीला ... पंख पसरून झेप घेऊ पहाते कधी कधी पडते, प्राक्तन येईल चालून रोज असते मी जगणीला ... अवतरेल जेव्हा साक्ष...

ते दिवस...

  जग अंधारात बुडलेले मी रस्त्यावरून चालत आहे , शांतता निपचीत पडलेली मनात काहूर माजवत आहे... दूर किनारा थांबलेला जरी वाटे आधाराला उभा आहे, बेभान लाट फेसाळलेली उसळून येता तो दूर लोटत आहे... कळले ना मज कधी मन जे प्रेमाने ओतप्रोत आहे, मी ठेवले कोरेचं मनाला तो काळजांचे ठसे देत आहे ... माझ्यात काय ? पाहिले त्याने कोण जाणे सांगेल का?, सांगणारे बोले माझ्याचंसाठी तो अश्रूप्याले भरत आहे... सोबत होता तो महाविद्यालयात एक चांगला मित्र म्हणून, विसरले मी दिवस ते तो आजही न जुळलेले नाते जपत आहे...