चार भिंती...

 

चार भितींचा आडोसा जेव्हा मिळाला ,
आनंद किती झाला या मुक्या मनाला ...

पाझरले कधी बाष्प प्रेमाचे जेव्हा ,
भिंती ओलावल्या दव उमटून आला ...

कधी अवरोध केला उन्हांच्या चटक्यांना,
सावली स्तब्ध देऊन जीव लावला तयाला...

होईल भारांचे पिसे नको सांगु मनाचे गुढ यांना ,
निष्प्राण भिंती तरी कान दुःख ऐकावयाला ...

उबंरठा सदैव देई पहारा तरीही शत्रू तेथेच आला ,
बघ लाऊनीया दार आता दुःख लावले परतीला ...

डोकावुनी गवाक्षातून चंद्र प्रितस्पंदनाने येऊ पाहतो,
कुणी सांगा त्याला नको हूरहूर लावू तरण्या जीवाला...

कुंचला रंगात बुडवूनी घेतला मनाच्या आवडीचा,
विट विट बोलली पहा "अरे वेड्या तु जीव ओतला "...

थांबू इथेच की पुन्हा गुंफू कवितेत मन शब्दांना,
सुचून येता लिहायला जसा वारा वाहे मंतरलेला ...

वाटते आता गीत व्हावे माझ्या शब्दशब्दांचे ,
सूरताल मिळता पूर्णत्व येईल माझ्या गाण्याला...

असेल क्षितीजाला उभी ती  दूर वाट पाहे ,
गित गात असेल विश्व सारे मांडले जे तू थाटणीला ...

पंख पसरून झेप घेऊ पहाते कधी कधी पडते,
प्राक्तन येईल चालून रोज असते मी जगणीला...

अवतरेल जेव्हा साक्षात स्वप्न माझे धरणीला ,
शब्दं शब्दं दरवळेल मुखात मनात आनंदाला...

अवसेचा अंधार काळागर्द दाखवू पाहतो भितीला,
भिंती याच असतात खंबीर उभ्या माझ्या रक्षणाला ...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...