तुझं निष्पाप असण...
कोण करतो व्याख्या, पाप आणि पुण्याची
जन्मी आला मनुष्य ,घेऊन असंख्य तारा जगण्याची ...
नाती सांभाळ समाजाचे ,होते तरजोड आयुष्याची
लेवुन कणखर बाणा, हळवे होते एकांताशी ...
किनाऱ्याने शर्यत लावली लांटेशी, टिकेल तुझ्या स्पर्धेशी
आदळून प्रवाहाला रेतीत विरला ,मागे उरला निशाणिशी ...
झुंबड घेऊन येती मधमाशा ,टिपायला मध बागेशी
फुले असतात तत्पर ,वाहून परागकण बीजे अंकुरण्याशी ...
सृष्टी आहे सुंदर, थोडी- गोड थोडी -कडू झगडण्याशी
मिळालो आपण दोघ ,संसाररुपी सागरात पोहण्याशी ...
तुझं-माझं प्रेम खरं असणं, अलौकिक आनंद जगण्याशी
'तुझं निष्पाप असणं' माझं तुझ्यात दिसणं, अंतरी दिवा मंदिराशी ...
सौ. मनिषा आ. वांढरे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा