नात्यांला नाव...
या नदीच्या काठावर मी बसले होते ,
निर्मळ त्या पाण्यावर रुसले होते...
वाऱ्यांशीही कट्टी तरी सांगा त्याला,
ते खळाळत पाणि नदीचे तालात होते ...
रेतीचा फसवा राग रेतीतच विरे ,
तो किनारे लालबुंद नदीचे प्रेमात होते...
तो अज्ञात व्यक्ती किती हुतूहल मला,
रोज त्यालाच पाहण्या तातकळत होते...
शब्दांशी गट्टी कधी केली नाही त्याच्या,
फक्त डोळ्यांला प्रेमाचा आसरा मागत होते...
नकार ना होकार फक्त नजरेचा खेळ ,
नात्यांला काय? नाव द्यावे मन हिनवत होते...
या नदीच्या काठावर मी बसले होते ,
निर्मळ त्या पाण्यावर रुसले होते...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा