अश्रू वाहून गेलेले...

 

डोळे होते दुःखावलेले , अश्रू वाहून गेलेले ,
कळले ना मला कधी , अश्रू वाहून गेलेले...

स्वप्ने पाहिले ज्यांच्यासाठी , घाव दिले त्यांनी,
रंगवलेल्या वाटेवर कधी ,अश्रू वाहून गेलेले...

प्राण होता जो , तो प्राणच माझा निष्प्राण ,
उसवलेल्या श्वासांत कधी,अश्रू वाहून गेलेले...

वसंत दूर्धर ग्रासलेला, श्रावणही खंडीत ,
बसरणाऱ्यां श्रावणात कधी ,अश्रू वाहून गेलेले...

विरह जीवघेणा हा, का ? अश्रूचे नाते हे,
जोडून तोडले मनाने कधी,अश्रू वाहून गेलेले...


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा