भावनांना पुर आला...

 

गारवा तुषारांचा गालावर ओघळला,
थंडगार झुळकेसह तेव्हा भावनांना पुर आला...

हव्याहव्याश्या या रिमझीम धारा,
हर्ष मनाचा ओसंडला भावनांना पूर आला...

निळ्या आकाशाला वेढले काळ्या ढगांनी,
प्रेम होऊन बरसली सर तेव्हा भावनांना पूर आला...

हूरहूर ती कातरवेळी तुझ्याच आठवांची कातर,
ओलांडला उबंरठा पावसात तेव्हा भावनांना पूर आला...

प्रेमाच्या वाटेवर सांभाळता सांभाळत नाही मन,
खळाळत जाते समुद्राकडे तेव्हा भावनांना पूर आला...

टिप्पण्या