मकरंद प्रेमाचा बोलला...

 

छंद तुझा लागला ,
मकरंद प्रेमाचा बोलला ...

भास तुझा चोहीकडे ,
आरसाही मग हळूच छेड काढे,
का? तु असा माझ्यात गुंतला ,
छंद तुझा लागला ...

प्रतिबिंब तुझे माझ्यात गडे ,
किती लाजू तुझ्या नावाने ऐके ना सवंगडे,
का? माझा श्वास तुझ्यात गुंतला ,
छंद तुझा लागला...

दिसे ना मज बंधनांची कडे ,
स्वर्गसुख हेच सांगत मन उंच उडे,
का ? मनाने ध्यास तुझाच घेतला ,
छंद तुझा लागला ...

प्रेमाच्या

रस्त्यावरही ना रुततील खडे,
तुझा हात असे हाती मिळून आयुष्याचे गिरवू धडे ,
का ? मजवर रंग तुझाच चढला ,
छंद तुझा लागला ...

छंद तुझा लागला ,
मकरंद प्रेमाचा बोलला ...


टिप्पण्या