हाक देते मी...
सांडग आपली श्रावणातली ,
तु ऊन मी रिमझीमणारी सर,
कधी भेटतो गर्जून ,
कधी इंद्रधनुष्यी रंगलेली धून...
मी वाहणारा बेधुंद वारा,
तु स्तब्ध तठस्थ वड ,
झिरपते मग मी पानापनातून ,
तुझ ओलचिंब झालेल मन ...
सागरी मुऊशार किनारा तु ,
उमटलेले पाऊलांची ठसे मी,
लाटेसवे दोघेही विरघळून ,
रंग उमटती क्षितीजातून ...
तुझे माझे काही जमेना तरी,
तुझ्यासाठीच हूर हूर उरी ,
प्रेम माझे दिसते तुझ्या डोळ्यातून,
हाक देते मी काळजातून ...
सांडग आपली श्रावणातली ,
तु ऊन मी रिमझीमणारी सर,
कधी भेटतो गर्जून ,
कधी इंद्रधनुष्यी रंगलेली धून...
अप्रतिमच रचना 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
उत्तर द्याहटवा