तुझ्या आठवणीत...

 

तो नभ वेडावलेला बरसे आठवणीत तुझ्या ,
तिव्र छटा उन्हाच्या काळजाला सावलीत तुझ्या...

सुगंध शब्द कळ्यांचे आताही मला चेतवते ,
स्वप्न रंगवूनी सवे का? फिरलीस शब्दाला तुझ्या ...

भासे जातो दूर तुझ्या पण अंतर पडत नाही,
असण्या नसण्याच्या किती ? नोंदी ठेवू तुझ्या ...

का? विणले मोहजाळे तु भोवताली माझ्या ,
मी पूर्ता गुंतलो अन् श्वास गुंतला श्वासात तुझ्या ...

वाटे घ्यावा प्राण तुझा पण मी इतका निष्ठुर नाही,
तुला हसतांना पाहूण जगतो मी कोषात तुझ्या ...


सौ. मनीषा आशिष वांढरे...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...