निर्धार...
केला निर्धार पक्का मनाशी तमा ना कशाची ,
द्वेष ना कुणासाठी मनी भिती ना कशाची ...
ठिणगी उजाळली काळजाला धार सत्याची,
वाट मशाल होऊनी पेटेल वणवा आकाशी ...
चालता चालता वाटेला येईल धार कांट्यांची ,
उसवणार धागे जीवनात गाठ पडेल नात्यांशी ...
अंधार येईल डोळ्यासमोर वाट दिसणार नाही,
घाबरू नको उरेल तेच उभे जे तुझ्या पाठिशी ...
उतावीळ नको होऊ कधी ध्येय लांब अजूनही ,
सुरवात तुझी झाली धावायचयं तुला पिढ्यांशी ...
सौ. मनीषा आ.वांढरे ...
खूपच छान
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवा