शिल्पकार...

 

वारा तो बिथरलेला , दिशा न त्याला ,
अनोळखी वाटेवर , चालेल कसा सोबतीला ...

पायात बांधुनी घुंगर , बोळी बोळी हुंडाळील्या,
ध्येय त्याचे हरवलेले, कशी देईल दिशा दिशेला ...

अंतरंगात डोकावूनी बघ , ऐक आवाज मनाचा,
खरं खोट कळेल तुजला , दैव असेल साक्षिला ...

भरकटू नको जीवनात , अनमोल या क्षणात,
भरवसा नाही घडीचा , व्यर्थ नको आयुष्याला ...

ससेमिरां व्यसनांचा , जखळून घेईल जाळ्यात ,
क्षिणशील तरी ना येईल किव ,पाषाण करेल मनाला...

मार्ग सापडेल तुझा तुला , तुच तुझा शिल्पकार ,
नको सोबत दिशाहीन वाऱ्याची , वारा तो बावरलेला ...

वारा तो बिथरलेला , दिशा न त्याला ,
अनोळखी वाटेवर , चालेल कसा सोबतीला ...


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...