ते दिवस...
जग अंधारात बुडलेले मी रस्त्यावरून चालत आहे ,
शांतता निपचीत पडलेली मनात काहूर माजवत आहे...
दूर किनारा थांबलेला जरी वाटे आधाराला उभा आहे,
बेभान लाट फेसाळलेली उसळून येता तो दूर लोटत आहे...
कळले ना मज कधी मन जे प्रेमाने ओतप्रोत आहे,
मी ठेवले कोरेचं मनाला तो काळजांचे ठसे देत आहे ...
माझ्यात काय ? पाहिले त्याने कोण जाणे सांगेल का?,
सांगणारे बोले माझ्याचंसाठी तो अश्रूप्याले भरत आहे...
सोबत होता तो महाविद्यालयात एक चांगला मित्र म्हणून,
विसरले मी दिवस ते तो आजही न जुळलेले नाते जपत आहे...
अप्रतिम सुंदर लिखाण ताई
उत्तर द्याहटवा