शिव शंकरा...

 शिव शंकरा...

शिवशंकरा करुणाकरा , महती तुझी रे न्यारी,
त्रैलोक्यदाता विश्वविधाता, भक्तीत जाऊ रे वारी...

पार्वतीचा पती खंडेराया, बानूची भक्ती पावली,
कैलासवासी संन्यासी तरी, केली पत्नीची इच्छा पूरी...

संहार करतो दानवाचा, घेऊनिया स्वरूप विक्राल,
महाकालीलाही शांत करी, ऐसी शक्ती भरली उरी...

विष प्याला प्राशन करूणी, झाला निलकंठ भगवान,
मर्यादेपर्यंत साहतो घडा भराता,अक्षम्यानों तैयार संहारी...

कर्दनकाळ तो पापाचा तरी, कृपा भक्ती श्रध्देतूनी अमाप,
देतो वरदान मनवांच्छित , उपाय तयातच दडलेली सूरी...

गंगा समावली जटे मध्ये, संगे चंद्राचीही उगवते कोर ,
रुद्राक्षमाळा प्रिय शंभूला, बेलपत्री वाहा मनअर्पूणी शिरी...

नेत्र भाळीचे उगवता, होतो भस्म संसार विनाशी,
भोळा आहे शिव माझा, तांडव क्रोध विनाशकारी ...

मन होता उद्विग्न , लागत नसे कुठे छळे जर तुम्हा,
आरोह अवरोह ओंकाराचा, ध्यान मनास शितल करी ...

तो बिंदू मन प्रकाशमान करी, आळविता तयास,
अविचारी मनाचा खेळ संपेल, ह्या आध्यात्म तलवारी...

सौ. मनीषा आशिष वांढरे...


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...