धागे तुटले...

 

मी आजही त्याच वळणावर वाट पाहत होती ,
त्याचे येणे मंद अधिर झुळूक रोज साहत होती ...

ती जीवघेणी कातरवेळ निशब्द तेव्हा जाहली,
तोडून पाश तो वळला तरी मी साक्ष तिथेच होती...

तो दिसला कधी की गालातच हसायचा शांत,
मनात का? असंख्य प्रश्नाचे वादळे घोंगावत होती...

दूर लोटले कितीदा मी आठवांच्या सावल्यांना,
बिलगून रडती अश्या जशी पाठवणी केली होती...

आराधनेचा पवित्र अभंग मी तुझ्या मुखीचा होते,
हार फुलांचे ओवतांना धागे तुटले उपटलेली पाकळी होती...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...