हा वादळ वारा...
श्वासांसवे श्वासात कसा ?, हा वादळ वारा,
तिमीरातूनी गोंजारतोय अश्रु ,हा वादळ वारा...
त्रस्त मायभू त्रस्त ,केव्हाची देऊनी जन्म,
कसा? जन्मला विध्वंसक , हा वादळ वारा...
लाख केले उपास ,कष्ट घेतेले किती ? किती ?,
उगाच पालथ्या घड्यावर पाणी ,हा वादळ वारा...
पालापाचोळा ही सोबती , घेऊन स्वप्नाची नक्षी,
दिलासा द्यावा कसा ? , सैराट हा वादळ वारा...
पुन्हा फिरूनी आले ,पक्षी परतुनी घरट्यांवर,
घरट्यांच्या सावल्या ओरबडून गेला,हा वादळ वारा...
साहवेना मंद झुळूकही , कधी जी गारवा दयायची,
उष्ण झोतांसवे फुंकरही ,चटके देती हा वादळ वारा...
अप्रतिम सुंदर रचना ताई, निसर्गातील बदल कवितेतून दर्शविला
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर रचना ताई, निसर्गातील झालेला बदल कवितेतून दर्शविला
उत्तर द्याहटवा