जीवन हे रहस्य...

 

जीवन हे रहस्य जीवनाचे ,
हसते रडते तरीही जगते,
कोलमडते तुटते पडते,
धडपडूनी पुन्हा पळते,
जीवन हे रहस्य जीवनाचे...

काटे काटे रस्त्यात वेचते,
वळणावर रडकुंडीला येते ,
कुठे हरवते कुठे सापडते,
सापडूनी पुन्हा उठते,
जीवन हे रहस्य जीवनाचे ,
हसते रडते तरीही जगते...

मृत्यू सत्य सत्यास डावलते,
जेवढे जगते पुन्हा जगते,
अमर स्वतःला स्वतःच करते,
जगण्याचे नावच जीवन सांगते,
जीवन हे रहस्य जीवनाचे ,
हसते रडते तरीही जगते...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...