ताऱ्यांच्या शहरात...
आभास तुझा सख्या रे, दूर ताऱ्यांच्या शहरात घेऊन गेला,
मृगजळी गंध फुलांचा रे, स्वप्नवत त्या दुनियेत घेऊन गेला...
का? वाट अबोल निवडली, स्वर्गिय आनंद तुला मिळाला,
छळणाऱ्या रात्रीला सांग, तु चांदणीचा प्रकाश घेऊन गेला...
ओजंळीत भरले मी ते भास, चेहर्यावर शिंपडण्यासाठी,
ऊडून गेले वाऱ्यासवे असे, सुगंधी अत्तरांचे श्वास घेऊन गेला...
बोलले चांदणे माझ्यासवे, खिजवून हसू लागले बाबडे,
आयूष्य तुझे हरवले सखे , तो जगण्यातून जीवन घेऊन गेला...
प्रकाश त्यांचा तो पिवळा पांढरा, टिमटिम करतो हसरा,
कवडसे येती मजवर त्यांचे, रेशीमगाठ उकलून घेऊन गेला...
उरल्या त्या बोळीत खुणा कोरलेल्या, छपरा आड लपलेल्या,
हृदय कोरले स्पंदने हरवले, काळजांचे तुकडे घेऊन गेला...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा