संभ्रम...

 संभ्रम...


मनीच पाखरू उडू लागलं,

आकाश ठेंगण पडू लागलं

मीच राजा आकाशाचा संभ्रम पडला,

यातच त्याचा घात झाला ...


चाल जपुन मणुजा,

काटे पेरलीया वाटा

नुसतीच पांघरूण फुलांची चादर संभ्रम पडला,

यातच त्याचा घात झाला ...


मीच श्रेष्ठ या पृथ्वीवरी,

दूसरा तिसरा नाही कुणी

अजाण वृत्तीला संभ्रम पडला,

यातच त्याचा घात झाला ...


नाजुक कळीला हळुवार जपले,

मायेची पाखर प्रेमाने संचारले

आनंद गगणी मायेना झाले,

खरे सत्य तेव्हा उमगले ...


सौ. मनिषा आ. वांढरे ...



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...