स्त्री...
स्त्रीची संवेदना प्रित मन आराधना
स्वरचित कल्पना श्रावणाची चित्रांगणा...
सरगम गाईलेली ती स्वरांगणा,
काव्य अपर्ण जीला ती शब्दांगणा...
अस्तित्व उमटवलेली विरांगणा ,
शौर्य जीची विरासत ती रणागंणा...
ज्ञानज्योत तेवणारी ती विद्यागंणा,
संस्कार मोती उधळणारी मुक्तागंणा...
ताल सुर जीवनाचा थिरकते ती नृत्यागंणा,
निखळ हास्य फुलवणारी हर्षागंणा...
सौदर्यं दृष्टी लाभलेली सृष्टीची नेत्रागंणा,
चकाकणारी मनामनांत आसमंती तारांगणा...
सौ . मनीषा आशिष वांढरे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा