प्रतिबिंब हे...

 

सांभाळा मनाला काचेचं प्रतिबिंब हे,
जराशी ठेच लागता तडकणारं पिंड हे...

सुंदर पारदर्शक लोभस अभिव्यक्त,
जरा ओरखडे जिव्हारी लागणारं बिंब हे...

क्षणात टिचकते ओल्या मनगटी काचबांगडी,
नाजूक काया  कधी भासे हिरवा निंब हे ...

रिमझीम सर काचेची काचेत मिसळती ,
शुभ्रकांती तनूची नक्षी शहारून चिंब हे...

तो हळूच उगवतो साक्ष देत स्वतःची,
गाली ओघळते जसे साजूक अहर्बिंब हे...


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...