जीव चिंब भिजला...

 रंग उधळला सख्यांनी आसमंत प्तरंगी न्हाहला,

खेळला रंग अवनी ने असा इथला जीव चिंब भिजला...

रंग रात्रीचा काळा उषा घेऊन आली पिवळा कोवळा,
सागर रंगला मेघ रंगी क्षितीजाने सांजेला लाल फासला...

पळस घेऊन लाल नारंगी वळणावर लपून बैसला,
पानी रंगात रंगून साऱ्या शेवटी रंग निथळून राहीला...

फुलांनी तर कळसच केला पांढरा गुलाबी सवे सुगंध,
पर्ण ही हिरवा लेवून मनामनाला सुखाचा गारवा दिला...

चंद्र रंगास बघुनी हरवला तो शितल पांढराच  उरला,
जीव जडला असा धरतीवर तोही तिच्या रंगात रंगला...

सौ. मनीषा आ. वांढरे ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...