जीवनात रंग भरशील का ?...
जीवनात रंग भरशील का ?,
सांग ना सखी माझी होशील का ?...
स्पंदनाची गीत गात येशील का ? ,
हृदय माझे नाव तुझे कोरशील का ?...
देवाण-घेवाण प्रेमाची करशील का ?,
प्रेम माझे स्वीकारून प्रेम देशील का ?...
भास सुखाचा मृगजळ तु होशील का ?,
मी उभा तुझ्याचसाठी नाव भांगात भरशील का ?...
हात घेऊनी हातात अग्नीला फेरे घेशिल का ?,
दुःख वाटून माझे तुझ्या सुखाचा भरवसा देशील का ?...
मन हे काचेचे माझे काचेचे घर बांधशील का ?,
रुतणार ना हृदयात माझ्या ती काच तु होशील का ?...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा