लपाछपी...
लपाछपी खेळूया लपाछपी खेळूया,
नजरेने बोलूया नजरेने शोधूया,
हुरहूर लागता मनी प्रेम समजून घेऊया,
लपाछपी खेळूया लपाछपी खेळूया...
धडधड काळजांची वाढवूया,
कधी लपंडाव तुझा देऊया,
कधी डाव माझा घेऊया,
ऐकमेंकास जूळवून घेऊया,
लपाछपी खेळूया लपाछपी खेळूया...
विरहात होरपळून जाऊया,
प्रेमात भावनांना सजवूया,
बोल स्पंदनाचे बोलूया,
आनंदी आनंद उधळूया,
लपाछपी खेळूया लपाछपी खेळूया...
विश्वात दोंघाच्या हरवूया,
हरवलेले ऐकमेकांस सापडूया,
रात्र चांदण होता रातराणीसवे दरवळूया,
लपाछपी खेळूया लपाछपी खेळूया...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा