आर्त तुझी हाक...

 

आर्त तुझी हाक आई काळजांचा ठाव घेते ,
त्याग तुझा पाहूनी इश्वरही मनाचा भाव घेते ...

रोष ओढते दुनियेचा लेकराला सांभाळते ,
लाख गुन्हे पोटात घेऊनीया जीवाला घाव घेते ...

इश्वरी रूप तुझे देवालांही स्वर्गी लाजवते ,
दुःखाला कवटाळून लेकरांचा अनुभाव घेते ...

त्याग आईचा जगी ऋण फिटता फिटणार ना ,
कष्ट तिचे थोर डोळ्यातले पाणी अंर्तभाव घेते ...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...