दव आठवांचे ...

 

दव आठवांचे स्पर्शिता मनाला ,

अबोली फुलवे पाना फुलांना ...

ऐकटीच उभी न्याहळी दवांना ,

टिपायला पाहे डोळे त्या क्षणांना ...

सखे कोमेजू नको तु आठवूनी त्यांना,

हरवले मोती ना गवसले धाग्यांना ,

रेतीचे उडने खुपते डोळ्यांना ,

काही अपूर्ण भासे झुरतांना ...

पाठमोरी उभी मी उबंऱ्यांना ,

ओलांडतांना बजावले त्यांना ,

नको पाठलाग आता मला छळतांना ,

समोर आले तिथून चालतांना ...






            
      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...