धून...
शब्द कुठला घ्यावा उधार नात्यांपलिकडले गीत गाण्या ,
बासरीवर वाजते ती अविस्मरणीय धून कृष्णाचे गीत गाण्या ...
ओजंळीत भरून भार आसवांचा किती काळजाला विचारा ,
डोळे जुल्मी गडे नादावलेले भाव रूजते गाली ओघळण्या ...
तुटता ती गाठ मनाची कधीतरी जूळते कुणाशी नकळत ,
रिती मनाची घागर होते हृदयी स्पंदनाला घायळ करण्या ...
बोल ओलव्याचे करपले उन्हात वाफही दिसली कुठे सांगा ,
मृगजळ होते दुपारच्या पहरी नाव केली त्यांने तिथे तरंगण्या ...
ती नटली हिरवा शालू नेसून बरसेल रिमझीम रुणझून ,
मृग उलटला तरीही तो तिथेच उभा स्वतःला सांभाळण्या...
शब्द कुठला घ्यावा उधार नात्यांपलिकडले गीत गाण्या ,
बासरीवर वाजते ती अविस्मरणीय धून कृष्णाचे गीत गाण्या ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा