मन हर्ष मिलनाचा...

 

ओंजळीतला सुगंध कळ्यांचा, जागवी स्पर्श मिलनाचा ,
छळतो सुहास अविस्मरणीय, जागवी मन हर्ष मिलनाचा...

छेडतो धूंद मंद चाफा, उधळला  मऊशार केसांवर,
घसरता लांब काळ्या रेशमावरून, रेशमी मन हर्ष मिलनाचा...

कोमल कळ्यां पदकमला खाली, उब देई प्रेमाची जरी,
रंग लागला मला त्यांचा, सुगंधित मन हर्ष मिलनाचा...

रात्र चांदणे लपवून येई, चंद्राची चाहूल ना देई,
रोमरोमी पुलकित करी , ओलावून मन हर्ष मिलनाचा...

मोरपिसांतून वारा छेडीत जाई, प्रेम सख्यावर किती ?
श्वास होऊन तो श्वासांत भरे, आयूष्य मन हर्ष मिलनाचा...

सोनेरी ती सांज जाहली, पाकळ्यां सर्व मिटून घेतली,
रात्रीच्या पायथ्याशी बसून आठवी,मन हर्ष मिलनाचा...

कुठेतरी दूर स्वप्नांच्या गावा, तो कसा तिथेच हरवला,
आसवे वाहतांना गाली सांगते कहानी ,मन हर्ष मिलनाचा...


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...