समांतर...

 

ऐ ऐक ना ,
नको ना ते भितीचे सावट ,
नाही अस्तित्वाची लढाई ,
तु आणि मी ,
अंगाने जरी भिन्न तरी ,
सोबती आपण ,
सारखीच आपली लढाई ...

नाही लावत मी तकादा ,
सारखा तुझ्याकडे मागण्याचा ,
का? मला मागावे लागते ,
ही शोकांतिका नाही वाटत का ? तुला ,
काय ? मागावे मी ,
जे तुझे आहे तेच माझेही ,
मग हा आडरस्ता कशासाठी ,
एकच रस्ता असणाऱ्या ,
कुणाच्या शिवारांची विभागणी ,
कुणी पेरले हे बियाणे ,
मुलगा थोर मुलीचे रडगाणे ,
वंश कुणी ठरवला ?,
दिवा पणती चा बारदाणा ...

दोघेही आपण हुकमाचे ऐक्के ,
एकांच दान दूसरा पदरात घेतो ,
सृष्टीही आनंदी होते या मिलनाने ,
जीवनाची निर्मिती साजरी करते उत्साहाने ,
सौंदर्यांची बघ मग होते उधळण ,
भेद नसतोच कोणता ,
फक्त तू आणि मी ऐवढेच निराळेपण ,
नाही झुगारायचे मला ,
माझ्या संसाराचे नाते ,
मी निभावते प्रामाणिकपणे ,
तुझे ही बदलू दे युगांयूगाचे संरचने ,
ऐवढेच कर तू फक्त ,
राहीलेले दोघेही सांभाळून घेऊ आजन्मे ...

ऐ ऐक ना ,
आता एक होऊना ,
सुरवात आपल्यापासूनच करूना ,
समांतर रेषा भाग्याच्या दोघेही समांतर जाऊना ...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...