आशा ...

 

अंधार जरी दाटला आज , मनात नाही खंत ,
अदृश्य किनारा आज , तरी मनात नाही खंत ...

दरीवरून कोसळले मी ,वाटले स्मशानात गेले,
जीद्द अजूनही कायम , जरी दुःखास नसेल अंत ...

मनात इच्छाचा डोंब उसळलेला , वेळ अपुरा ,
संसारात राबते खुशीत , छंद लिखाणाचा भासे संत ...

क्रोधात चुकते अनेकदा , विचारही होते अभद्र ,
तुझ्या साथीने जीवनाला बहर , मन माझे तुझा प्रांत ...

पहाटेची कोवळी रेशीम , स्पर्श गालाला करते ,
हसते मी मनात , हीच खरी उद्याची आशा निवांत ...


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...