कल्पनेचा पसारा...
हो ना हवा एक दिवस माझा,
मांडेल मी कल्पनेचा पसारा माझा...
उडेल त्या नभांगणी चाळील तारे,
भाव करत चंद्र घेईल विकत माझा...
काजळ त्या काळोखाचीच मागेल,
डोळ्यांची छटा सजवेल चेहरा माझा...
रंग लालजर्द डांळीबाचा नको ,
क्षितीजालाच म्हणेल दे रंग माझा...
रंग शिंपडेल अंगणात त्याच्यासाठी,
रंगाची होळी खेळेल रोज कृष्ण माझा ...
स्वतः जगेल मी आता शक्य नाही,
क्षण विखूरला प्राणही नाही माझा...
हो ना हवा एक दिवस माझा,
मांडेल मी कल्पनेचा पसारा माझा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा