पायबंध...

 

पायबंध जगण्याचे पायानेच तुडवले ,
लांघुन सिमा मी जीवनाला घडवले ...

हरवले गाज ऐकता ती समुद्राची तीव्र ,
अस्त सूर्याचा पाहता उध्वस्त पाखरे उडाले...

हिम तुषारं वितळले नदीने वाहून नेले,
मिसळले सागरात पिण्यास पाणी ना उरले ...

प्रेमाने ओटीत दान दिले साहले वार किती ?
रोखले डोळे सहस्त्र कट्यार तनुवर फिरले...

तो लोटून गेला अंधारात ती चाचपडत दिवे ,
अपेक्षा मिलनाची होती तिला विरहाने घडविले ....


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...