पाचूच चांदण बहरणं...
तुझं जीवनात येण, जस आसमंती चांदण पसरणं ,
ग्रीष्माच्या वाळवंटात बघ, पाचुच चांदण बहरणं ...
गुलाबाला भ्रमराचे छेडणे, आवडले त्याचे बोलणे,
रंग गर्द लाल करत लाजून, गालात कळीच फुलणं ...
वाऱ्यांचा झोत वाहून गेला, सवे सुगंध वाहून नेला,
रोमांचित कळीकळी , काहीतरी गुपीत उलगडणं...
कवडसे मनाचे डोकावे, प्रकाशझोत कुठन यावे,
अविश्वसनीय सत्य प्रेम, नशीबाचं बासरी होणं ...
मन मंदिर झाले, प्रेम स्पंदनात जागले माझ्या,
तुझ्या भेटीची आस सख्या, विरह क्षणाचा बोचणं...
,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा