पाहताच क्षणी...

 

पाहताच क्षणी...

रिमझिम झरणारी बरसात,
व्याकूळ मन घाली मिलनाला साद
मोरपिसारा फुललाय भरात,
पाहताच क्षणी तुला, पडले मी प्रेमात ...

झुरतेय मी सुहान्या मौसमात,
नजर चोरून टाकते कटाक्ष तुझ्यात
धिंगाणा चाललाय मनाच्या अंगणात,
पाहताच क्षणी तुला, पडले मी प्रेमात ...

सूर छेडले प्रीतीचे लडीवार,
छळु नको ना हा भास तुझा चहूवार
ये ना सख्या माझ्या वास्तवात,
पाहताच क्षणी तुला ,पडले मी प्रेमात ...

घेऊन आरती ओवाळीते दिनरात,
कल्पनेला रंग चढते आयुष्यात
सावळे सोज्वळ रूप भरले मनात,
पाहताच क्षणी तुला, पडले मी प्रेमात ...

सौ . मनिषा आ. वांढरे...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...