रहस्य डोळ्यांतले...
रहस्यांनी भरलेले तिचे डोळे,
भेदक नजर करी मन वाटोळे...
घायाळ जखमांनी भरलेला तरी,
गाणार मी तुझेच रात्रंदिन पोवाळे...
वैशाख वणवा पेटतो ज्वलंत उरी,
व्याकूळ जीव बिचारा पायदळी गळे...
स्वर छेडले जे प्रेमात तडफडे,
विरह असह्य मन होई आंधळे...
प्रेम हीच शिक्षा माझी सखे,
रहस्य प्रेमातले अश्रू तळमळे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा