संभ्रमात ती...
संभ्रमात ती सखे कालही आजही ,
का? उपेक्षाचे ओझे हाती कालही आजही...
हसूचं उमलते तिचे चालताने काट्यावरूनही,
प्रश्न यातनेचा सारखाच तिच्या कालही आजही...
नश्वर या शरीराचे अप्रूप मन नाही का तिला,
मनास मारून जगने भाग नशिबांचा कालही आजही...
पडसाद नको मला वर्ण जाता जात नाही,
एकाच दिवसांची पुण्याई का? रे कालही आजही...
प्रसन्न मन केले जगणे सूखकर झाले तिचे,
पाणावलेल्या डोळ्यांत स्वप्ने होती कालही आजही...
अस्तित्व स्त्रीचे निर्मिती तिची जग चालवण्यासाठी,
मिटलेल्या पाऊलखुणा खुणाविती कालही आजही...
विरांगणा ती सहनशक्ती कळ जन्माची भोगती बघ,
तरीही नाजूका म्हणून हिनवती कालही आजही...
मन कफल्लक मुर्ख बात पिढ्यांन पिढ्यांची उगाळलेली,
चघळशील तूच पुन्हा पुन्हा किती ? कालही आजही...
आनंद मला यातच आज तू साजरा करणार,
दयायचा उदया समान हक्क विचार कालही आजही...
सौ. मनीषा आशिष वांढरे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा