तुझ्या उदरात जन्म घेऊनी धन्य मी...
आई तुझी किमया जगावेगळी आहे गं ,
सात जन्म अपुरे तरी पुन्हा येईन मी ,
तू गाशील अंगाई झोपी जाईल मी ,
सांग कसं फेडून ममतेला जागेल मी ,
तुझ्या उदरात जन्म घेऊनी धन्य मी ...
सोबतीला माझ्या चंद्र सूर्य तारे तरी आकाश ठेंगणे आहे गं ,
कल्पनेतून वास्तवाशी संबंध जोडेल मी ,
सुख म्हणजे काय तुझ्याकडे पाहून सांगेल मी ,
साधनेतून अध्यात्माशी नाते जोडेल मी ,
तुझ्या उदरात जन्म घेऊनी धन्य मी ...
प्रकाश प्रकाश आहे अंतरगांत तुझ्या गं ,
स्पंदनाचा ताल एकूण तुझा महिमा गाईन मी ,
व्याख्या पुनर्जन्माची तुझ्या मुखी ऐकेल मी ,
जागलीस रात्रंदिनी त्याचे पांग फेडील मी ,
तुझ्या उदरात जन्म घेऊनी धन्य मी ...
सांगतात सानेगुरुजी स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी गं ,
श्रीमंती मज लाभली पुण्याची जगाला सांगेल मी ,
सोसले मजसाठी तु जे काही त्याचा हिशोब कसा लावेल मी ,
जन्मोजन्मीचे नाते तुझ्या संगे ईश्वराला मागेल मी ,
तुझ्या उदरात जन्म घेउनी धन्य मी ...
तुझ्या उदरात जन्म घेउनी धन्य मी ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा