शेवटच्या श्वासापर्यंत...
नाव जोडले तुझे शेवटच्या श्वासापर्यंत ,
सातजन्म बांधले प्रेमास शेवटच्या श्वासापर्यंत ...
भाग्य तु माझे पाहिले तुला तव सांगते,
अनोळखी तरी अर्पीले मी शेवटच्या श्वासापर्यंत...
काळजांचा ठाव घेत स्पंदने बघ तुला बोलली,
तुझ्याचसाठी धडधडते मी शेवटच्या श्वासापर्यंत ...
आसमंत सारा निळाईने झाला किती लाघवी ,
लाजणे सोडून सांगु प्रेम करेल शेवटच्या श्वासापर्यंत...
चुकले जरी शब्द कधी वाट कुठे अडखडली,
हात दे तु हातात माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ...
🙏🙏 दादा
उत्तर द्याहटवा