मन जळणार सखे...
मन माझे अथांग सागर खवळलेला बेभान सखे,
नको करू हट्ट राहण्याचा यात मन बुडणार सखे...
उभ्या रानात वणवा पेटला मनात आकांत दाटला,
नको करू हट्ट राहण्याचा यात मन जळणार सखे...
लालनिळे निखारे ते तुला भासे पाचूचा सडा चौफेर,
नको करू हट्ट राहण्याचा यात मन भंगणार सखे...
तु शोधु पाहते आसमंती हरवलेला चंद्र माझ्यात,
नको करू हट्ट राहण्याचा यात मन हरवणार सखे...
माहित नाही तुला तु मन वादळाशी लावतेय,
नको करू हट्ट राहण्याचा यात मन उडणार सखे...
विखुरला गेलोय मी तुकड्यात तुला कसे जोडणार,
नको करू हट्ट राहण्याचा यात मन दुःखणार सखे...
मन माझे अथांग सागर खवळलेला बेभान सखे,
नको करू हट्ट राहण्याचा यात मन बुडणार सखे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा