गंमत...

 

सगळ संपल आता ,जाता जाता ती म्हणाली ,
डोळ्यात पाणी आणि तू काळजी घे ती म्हणाली ...

मला कळलचं नाही काय ? झाले , जरासा गोंधळलो,
काय? चुकले माझे सांग ना , काहीच नाही ती म्हणाली...

आता पूर्ता मी स्तब्ध झालो , कूणी काही बोलल का?,
सर्वांनी संम्मती तिली आपल्याला मग , शून्यात ती म्हणाली...

डोळ्यांना सोसवेना तिचे भाव, काळजात सलला घाव,
प्रेम करून चुकलो का? मी, पाठमोरी होऊन ती म्हणाली...

आता कोसळणारंच , त्या पांढऱ्या फरशीवर तेवढ्यात ,
हसून बिलगली जोऱ्यात बोलली ,एप्रील फूल ती म्हणाली ...

जीव जायचा वाचला माझा, नको रे बाबा हा जीवघेणा खेळ,
खोट बोलून कसली गंमत , अरे गंमत केली ती म्हणाली ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...