आस डोळ्यांत जागवी...
काजळी रात्रीची पीड रात्रभर , आस डोळ्यांत जागवी...
चांदण्यां रात्रीची सल रात्रभर , आस डोळ्यांत जागवी...
मिरा मी सख्या तुझी, गाते गीत प्रेम आराधनेत,
दर्शनास तुझ्या आतूर रात्र , आस डोळ्यांत जागवी...
तुला नाही जाण या मनाची, मी कधी ना तुज बोलले,
एकतर्फी प्रेम हे माझे स्वप्न, आस डोळ्यांत जागवी...
दोष ना तुझा ना माझा, विवश भावनेने केले स्तब्ध मला,
तूच स्पंदनाला श्वास हा अट्टाहास , आस डोळ्यांत जागवी...
सरकते त्या चांदण्यांचे निखारे , विरह जळतांना उशाशी ,
ओल्या उशीचे आक्रंदने मज, आस डोळ्यांत जागवी...
खूपच छान 👌
उत्तर द्याहटवा🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा
🙏
खूपच सुंदर रचना
उत्तर द्याहटवा