अरेरावी...

 

अरेरावी...
प्रेमात होती बघ आपल्या हक्काची अरेरावी ,
भासलेच ना मला ती संशयी मनाची अरेरावी...

तु माझीच फक्त दुसऱ्यांचा नको स्पर्श वारा,
प्रेमाची भांडणे गमतीने घेतली बोलाची अरेरावी...

माझ्यासाठी तूच जग माझे सांगून थकले,
का? कळत नव्हते तुला तुझी मीची अरेरावी...

ओलांडली नात्याची सिमा जेव्हा हात उठला,
भंगले मी तुकड्यात जेव्हा प्रेमात संशयाची अरेरावी...

तोडल्या तु स्वप्नकळ्यां उमलायच्या आधिच,
नको होती मला या असल्या प्रेमाची अरेरावी...

कोलमडून पडल्या त्या पारिजातकाच्या फांद्या,
सुंगाधित होता कधी तुझ्या अंगणात ऐकत ती अरेरावी...


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...