मैत्री की प्रेम...

 

का ? गं तुला प्रश्न पडतो नेहमी ,
तुझं आपले प्रेम की मैत्री नेहमी...

प्रेमात मैत्री नसते का? कधी ,
समरस होत जाते प्रेम मैत्रीत नेहमी...

जीवन तुझे आहे गीत गाण्या,
प्रेम माझे राहील सजवण्या नेहमी...

आधार वाटतो मला तुझ्या असण्याचा,
प्रेमात सर्वस्व अर्पूण देण्या सज्ज नेहमी...

तु दिसताच स्पंदने खुलते गुलाबापरी ,
मैत्रीचा हात तुझा प्रेमाची साथ नेहमी...

ओळख आता मैत्री की प्रेम असे,
मैत्रीची सोबत निरंतर प्रेमाचा हात नेहमी...


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुझं निष्पाप असण...