ऐश्वर्यांची गुढी...
चैत्राच्या उंबरठ्यावर ऐश्वर्याची गुढी उभारू ,
विश्वास प्रेम आपुलकीसोबत संवादाची गाठी बांधू...
हर्षास मारक चिंता निराशा उणेदेणे मागे टाकू ,
अडगळ सारी बाजूला सारून प्रगती किर्ती यशाची निव टाकू...
घेऊया कवेत आसमंत सारा असा पसारा मांडू ,
धरतीलाही गर्व होईल असे मातीत संस्कार पेरू ...
मावळतीला क्षितीजांच्या रंगास पाण्यात मिसळू ,
अध्या खेळू रंगीत सागरलाटा त्यात अंग अंग भिजवू ...
आतूर होईल श्रावण असा खेळ खेळाया उन्हांचा ,
मृगजळही पाझरेल असा चटक्यांना गारवा मनाचा देऊ ...
चैत्राच्या उंबरठ्यावर ऐश्वर्याची गुढी उभारू ,
विश्वास प्रेम आपुलकीसोबत संवादाची गाठी बांधू...
सुंदर लेखन ✍️👌👌👌 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
उत्तर द्याहटवा